दि रयत सेवक को ऑप बँक लि. सातारा या बँकेस आयकॉनिक लीडर्स अवॉर्ड जाहीर…
2024- 25 आर्थिक वर्षातील उत्तम कामगिरीसाठी तिसरा पुरस्कार…
सन्मानाची हॅट्रिक… चेअरमन नंदकुमार गायकवाड
महा शिक्षण टाइम्स :
आपल्या बँकेस EPlus Media यांच्या वतीने, नागरी सहकारी बँक असोसिएशन व नॅशनल को-ऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया (NCUI) यांच्या सहकार्याने Banking Tech Project of the Year अंतर्गत
“ Excellence of data quality for credit rating” या श्रेणीत ” *Iconic Leaders Award 2025”* हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
बँकिंग टेक्नॉलॉजी प्रकल्पांतर्गत, चारही CIC कंपन्यांना 100% अचूक डेटा सादर केल्याबद्दल रयत बँकेला हा सन्मान मिळाला आहे. यामुळे आपल्या बँकेची डेटा गुणवत्ता, अनुपालन (Compliance) आणि तांत्रिक कार्यक्षमता अधोरेखित झाली आहे. बँकेस ई-प्लस मिडिया यांच्या वतीने नागरी सहकारी बँक असोसिएशन व नॅशनल को-ऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने बैंकिंग टेक्नॉलॉजी प्रकल्पांतर्गत चार क्रेडीट इन्फॉर्मेशन कंपन्यांना १००% अचूक डेटा पाठविल्याबददल, बँकिंग टेक प्रोजेक्ट ऑफ द इयर अंतर्गत एक्सलन्स ऑफ डेटा क्वालिटी फॉर क्रेडिट रेटिंग या श्रेणीत ‘आयकॉनिक लीडर्स अवॉर्ड २०२५’ हा पुरस्कार मिळालेला आहे.
🏆 दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स् फेडरेशन लि., मुंबई यांचेकडून दरवर्षी सहकारी बँकिंग क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या सभासद नागरी सहकारी बँकांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन सर्वोत्कृष्ट बँक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील पगारदार नोकरांच्या सहकारी बँकांमध्ये अग्रेसर असलेल्या ‘दि रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँक लि. , सातारा’ या बँकेस सन् २०२४-२५ मधील ‘पगारदार नोकरांच्या गटातील बँका’ या गटातून सर्वोत्कृष्ट बैंक व्दितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला आहे.
🏆 तसेच ग्रीन वर्ल्ड व कॉसमॉस बँक यांच्या संयुक्त विद्यमाने, आदर्श कार्यपध्दती, सभासद हितसंवर्धन व सुयोजित आर्थिक व्यवस्थापनाचा ‘ग्रीन वर्ल्ड को-प्राईड २०२५’ हा प्रतिष्ठेचा सन्मान पुरस्कार बँकेस मिळालेला आहे.
हा मानाचा पुरस्कार सर्व संचालक मंडळ, बँकेचे सर्व अधिकारी आणि सर्व बँक सेवक वर्गाच्या सामूहिक प्रयत्नांचे व विश्वासाचे फलित आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांची निष्ठा आणि सभासद बंधू-भगिनींचा अखंड पाठिंबा यामुळे आज बँकेने हे गौरवशाली यश संपादन केले आहे. या यशामध्ये प्रत्येक सभासदाचा मोलाचा वाटा आहे. असे मत बँकेचे चेअरमन श्री नंदकिशोर गायकवाड यांनी व्यक्त केले.
सदरचे पुरस्कार प्राप्त झालेबद्दल रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार साहेब, मा. चेअरमन चंद्रकांत दळवी साहेब, मा. संघटक डॉ. अनिल पाटील साहेब, मा. सचिव विकास देशमुख साहेब, तसेच मा. सहसचिव, ऑडिटर, विभागीय अधिकारी इ. मान्यवरांनी बँकेच्या कामकाजाबाबत गौरवोद्गार काढून अभिनंदन केले. रयत बँकेस सदरचे पुरस्कार मिळालेबद्दल विविध स्तरातील अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
विविध स्तरांमधून आपल्या बँकेस मिळालेल्या या सन्मानाबदद्ल बँकेचे संचालक व सर्व रयत सेवक बंधू-भगिनी सभासदांचे चेअरमन नंदकुमार गायकवाड यांनी अभिनंदन केले आहे.






