हुतात्मा राजगुरू शैक्षणिक संकुलाचा निकाल शंभर टक्के
हुतात्मा राजगुरू शैक्षणिक संकुल पांडवनगर, पुणे विद्यालयाचा शंभर टक्के निकाल
महा शिक्षण टाइम्स :
रयत शिक्षण संस्थेचे हुतात्मा राजगुरू शैक्षणिक संकुल, पांडवनगर पुणे 16 या संकुलाचा मार्च 2025 एसएससी परीक्षेचा निकाल 100% लागला आहे. यंदाच्या वर्षी सुद्धा 100% निकालाची परंपरा शैक्षणिक संकुलाने राखली आहे.
यावेळी रयत शिक्षण संस्था पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी व हुतात्मा राजगुरू शैक्षणिक संकुलाचे प्राचार्य मा. श्री. संजय मोहिते व मुख्याध्यापिका सौ मनीषा गायकवाड यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना उज्वल यश प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तसेच अध्ययन अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षक वृंदांचे व सेवकांचे त्यांनी अभिनंदन केले. व याही वर्षी दहावीच्या निकाला बरोबरच विविध स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा अशीच कौतुकास्पद कामगिरी करण्यास सर्वांनी तयार राहावे असा मौलिक संदेश त्यांनी दिला.
संकुलातील ख़ुशी आनंद परदेशी या विद्यार्थिनीने 77% गुण मिळवत संकुलात प्रथम क्रमांक येण्याचा मान मिळविला. तर अंकिता गोविंद बिडकर 67 टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळवला तर सानिया मौलाली शेख 60 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला.
error: Content is protected !!