spot_img
spot_img
spot_img

इयत्ता दहावीच्या निकालामध्ये कोळाईदेवी विद्यालयाचे घवघवीत यश

 

कोळाईदेवी विद्यालयाची यशस्वी निकालाची परंपरा कायम

दहा विद्यार्थी 90% च्या वर

 महा शिक्षण टाइम्स :

एस.एस.सी बोर्ड परीक्षा 2024-25 चा निकाल नुकताच जाहीर झाला .श्रीगोंदा तालुक्यातील श्री कोळाईदेवी विद्यालयाचा निकाल 98.74% एवढा लागला आहे.
परीक्षेला एकूण 159 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 157 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तसेच 90% पेक्षा जास्त गुण मिळविलेले 10 विद्यार्थी आहे. विद्यालयाने नेहमीच आपल्या निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. विविध उपक्रमात अग्रेसर असणारे विद्यालय गुणवत्तेत सुद्धा अग्रेसर आहे . असे गौरवोद्गार विद्यालयाचे मुख्याध्यापक शहाजी हिरडे यांनी काढले.

विद्यालयाचे विद्यार्थी हर्षल मनोजकुमार जाधव 97.00% (प्रथम ) ,प्रांजल हेमंत लगड 96.40% व अभिरुची अजय लगड 96.40% (द्वितीय ), तसेच
श्रुती मनोज थिटे 95.60% व
अनन्या सुभाष खामकर 95.60%(तृतीय) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले आहेत. याशिवाय पायल पांडुरंग भापकर 93.40%, समीक्षा संदीप लगड 93%, श्रुती पंडित कवडे 91%, पृथ्वी मच्छिंद्र आढाव 90.40%, सार्थक मारुती खामकर 90.20% या विद्यार्थ्यांनी 90% च्या वर मार्क मिळून यश संपादन केले आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक शहाजी हिरडे,डी.टी.गायकवाड, दहावीचे वर्गशिक्षक संजय ठोकळ, प्रवीणकुमार लोंढे, माऊली गलांडे , स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन व सर्व सदस्य ,शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन व विकास समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य, माता पालक व शिक्षक पालक संघ, सरपंच, उपसरपंच,कोळगाव पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!