श्री कोळाईदेवी विद्यालयाला कर्मवीर पारितोषिक
ग्रामस्थांनी केला विद्यालयातील सेवकांचा सन्मान
महा शिक्षण टाइम्स :
श्री कोळाईदेवी विद्यालय कोळगाव या विद्यालयात रयत शिक्षण संस्थेचा सर्वोच्च बहुमान असणारे कर्मवीर पारितोषिक जाहीर झाले असून कर्मवीर अण्णांच्या पुण्यतिथी कार्यक्रमांमध्ये संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते ते मुख्याध्यापकांना प्रदान केले जाणार आहे. विद्यालयास कर्मवीर पारितोषिक मिळाल्याबद्दल कोळगाव येथील श्री ज्ञानेश्वर माऊली देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष मधुकाकालगड, हेमंत नलगे मित्र मंडळ चे हेमंत नलगे व कोळगाव ग्रामपंचायत चे सरपंच पुरुषोत्तम लगड यांनी सर्व सेवकांचा यथोचित सन्मान केला.
श्री कोळाईदेवी विद्यालयातील मुख्याध्यापक व सर्व सेवक वर्ग यांनी सन 2024 मध्ये केलेल्या कामगिरीच्या गौरवार्थ कर्मवीर पारितोषिक संस्थेच्या वतीने जाहीर करण्यात आले असून ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 66 व्या पुण्यतिथी निमित्ताने कर्मवीर समाधी परिसर,सातारा येथे दिनांक 9 मे 2025 रोजी सकाळी साडेआठ वाजता संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या हस्ते प्रदान केले जाणार आहे. सदर कर्मवीर पारितोषिक जाहीर झाल्यावर विद्यालयातील सर्व सेवक वर्गाने आनंद व्यक्त केला तसेच कोळगाव ग्रामस्थांनी विद्यालयातील सर्व सेवकांच्या अथक परिश्रमाचे कौतुक करून त्यांनी घेतलेल्या कष्टाचे साफल्य झाल्याच्या प्रित्यरार्थ श्री ज्ञानेश्वर माऊली देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मधुकाका लगड ,हेमंत नलगे, पुरुषोत्तम लगड यांनी कोळगाव ग्रामस्थांच्या वतीने मुख्याध्यापक व त्यांचे सर्व सहकारी यांचा फेटे, देवस्थानचा पंचा, शाल सन्मान केला.
यावेळी बोलताना देवस्थानचे अध्यक्ष मधुकाका लगड म्हणाले की, विद्यालयातील सर्वच सेवकांनी गेली आठ ते दहा वर्ष कोळगाव विद्यालयाला नव्या उंचीवर ठेवण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्याचेच फळ म्हणून दोन बहुमजली इमारती, क्रीडांगण ,संरक्षण भिंत, शौचालय, स्नानगृह, सायकल स्टॅन्ड, व्यासपीठ तसेच अनेक भौतिक सुविधा विद्यालयामध्ये सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने व देणगीतून पूर्ण करण्यात आल्या. त्यामुळे विद्यालयाने आता कात टाकली असून या पुढील काळात गुणवत्ता व शिस्त या गोष्टीकडे सेवकांनी कटाक्षाने लक्ष द्यावे अशी मागणी केली.
माजी सरपंच हेमंत नलगे यांनी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी संस्थेने महाविद्यालय सुरू करावे, कारण महाविद्यालयाची सोय कोळगाव मध्ये नसल्याने अनेक विद्यार्थिनींना पुढील शिक्षण घेता येत नाही. अर्ध्यावरच शिक्षण सोडून नाईलाजाने विवाह करावा लागत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांची भेट घेऊन महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव देणार असल्याचे प्रतिपादन यावेळी केले.
सरपंच पुरुषोत्तम लगड यांनी मुख्याध्यापक शहाजी हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सेवकांनी विद्यालयाच्या भौतिक सुविधांसाठी वेळोवेळी अनेक वर्षापासून ग्रामस्थ राजकारण विरहित विचाराने विद्यालयास सढळ हाताने भरभरून देणगी देतात. त्यामुळे आज भव्य इमारत उभी राहिली .वेगवेगळ्या भौतिक सुविधा करता आल्या. सभापती काळात काही निधी विद्यालयास उपलब्ध करून दिला व आजही सरपंच या नात्याने विद्यालयास काहीही कमी पडू देणार नाही अशी ग्वाही दिली.
विद्यालयाचे मुख्याध्यापक शहाजी हिरडे यांनी हा सन्मान सर्व सेवकांचा व ग्रामस्थांचा असून संपूर्ण विद्यालय लवकरच स्मार्ट इंटरॅक्टिव्ह बोर्ड ने डिजिटल होणार आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा कोर्स सर्वांना संस्थेच्या वतीने उपलब्ध होणार आहे अशी माहिती दिली.
यावेळी स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष अमित लगड यांनी मनोगत व्यक्त करून सर्व सेवकांचे अभिनंदन केले. याप्रसंगी विद्यालयाच्या सेविका सविता कारले, मंजुश्री धीवर प्रभारी उपप्राचार्य डी टी गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी ज्ञानेश्वर माऊली देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मधुकर लगड, सरपंच पुरुषोत्तम लगड, माजी सरपंच हेमंत नलगे, ग्रामपंचायत सदस्य चिमणराव बाराहाते, जयराज लगड, स्थानिक स्थूल कमिटीचे अध्यक्ष अमित लगड ,सतीश लगड, धनेश लगड ,राजेंद्र दळवी, अमोल भापकर, नितीन लगड, नितीन नलगे, नंदकुमार लगड, प्रदीप आढाव,जालिंदर नलगे, संजय नलगे, आबासाहेब शेलार ,ज्ञानदीप नलगे, नागेश लगड अजय लगड, ओंकार नलगे, कृष्णा थोरात यावेळी उपस्थित होते.






