spot_img
spot_img
spot_img

हुतात्मा राजगुरू विद्यालय पांडवनगर, पुणे येथे गुरुकुल वर्गाचे छंद वर्गाचे आयोजन

हुतात्मा राजगुरू विद्यालय पांडवनगर, पुणे येथे गुरुकुल वर्गाचे छंद वर्ग सुरू 

महा शिक्षण टाइम्स

रयत शिक्षण संस्थेचे,हुतात्मा राजगुरू शैक्षणिक संकुल पांडवनगर पुणे,16 या शैक्षणिक संकुलात रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाच्या वतीने रयत गुरुकुल छंद वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या छंद वर्गाचे उद्घाटन पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी संजय मोहिते यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मनीषा गायकवाड व त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते.

रयत शिक्षण संस्थेच्या हुतात्मा राजगुरू विद्यालय, पांडवनगर, पुणे येथे छंद वर्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम घेण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने इंग्लिश कम्युनिकेशन, विविध प्रयोग करणे, मातकाम, रंगकाम,चित्रकला, रांगोळी स्पर्धा, वनभोजन,क्षेत्रभेट,कविता वाचन, गणितीय प्रक्रिया, विविध प्रकारचे पारंपारिक असणारे खेळ, मेहंदी स्पर्धा,तीन पायाची शर्यत सामान्य ज्ञान स्पर्धा, वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीडा स्पर्धा इत्यादी विविध कार्यक्रम रयत गुरुकुल छंद वर्ग यामध्ये घेण्यात येणार आहेत.

या कार्यक्रमाचे नियोजन गुरुकुलप्रमुख  पराग शिवदास, उपमुख्याध्यापक बाबा शेलार , महेश दरे, राजेश पंदे , रूपाली सूर्यवंशी , चैताली शेळके , लीना पाटील  यांनी केले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!