डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोळगाव मध्ये उत्साहात साजरी
महा शिक्षण टाइम्स
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोळगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सायंकाळी त्यांच्या प्रतिमेची मिरवणूक गावातून काढण्यात आली.
कोळगाव येथे एसटी स्टँड चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून भीमवंदना देण्यात आली. यावेळी झालेल्या सभेत उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी माहिती विषद केली. तसेच त्यांनी दिलेल्या समाजाप्रती योगदानाबद्दल आदरभाव व्यक्त केला. यावेळी बापूसाहेब कर्डिले, नलगे सर, प्राध्यापक सुनील धस, उपसभापती बाळासाहेब नलगे, कोळगावचे सरपंच पुरुषोत्तम लगड यांनी आपले विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमास, सरपंच पुरुषोत्तम लगड बाळासाहेब नलगे, मच्छिंद्र नलगे, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र रणसिंग, प्रदीप आढाव, स्वप्नील धस ,चिमणराव बाराहाते, निलेश काळे, संतोष मेहत्रे, धोंडीबा लगड, प्रतिभा धस, दत्तात्रय जाधव, राजाराम काळे, विश्वनाथ लगड, सागर नलगे ,गोरख घोंडगे, किशोर धस, अक्षय उजगरे, हेमंत उजगरे, अनुप उजगरे, नागेश उजगरे, विकास उजगरे, संकेत उजगरे, बंटी उजगरे, वाल्मीक उजगरे, श्याम भोसले, प्रणत उजगरे, तुषार उजगरे, संकेत उजगरे, संतोष उजगरे, नागेश काळे ,संजय काळे ,अविनाश साठे, भाई शिंदे, तसेच भंते अल्हाट व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार महेशकुमार शिंदे यांनी केले.