शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये अकलूजचे जाधव माळशिरस तालुक्यात प्रथम
महाराष्ट्र शासन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डाएट वेळापूर व शिक्षण विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीने आयोजित शिक्षकांसाठी दर्जेदार व्हिडिओ निर्मिती स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये दहा हजार शिक्षकांनी सहभाग नोंदविला होता.
इयत्ता सहावी ते आठवी गटामध्ये इंग्रजी विषयात अकलूजचे मारुती दादा जाधव यांचा तालुका स्तरावरती प्रथम क्रमांक आला. त्यानिमित्त त्यांना रोख रक्कम तीन हजार रुपये पारितोषिक व ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
मारुती जाधव हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रताप नगर (चाकोरे )या शाळेत इन्चार्ज मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत.त्यांचे या यशाबद्दल सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.