महाराष्ट्र मध्ये 2025 पासून सीबीएससी अभ्यासक्रम लागू
महा शिक्षण टाइम्स :
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत तयार केलेल्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा या आधारे महाराष्ट्राचे स्वतःचे अभ्यासक्रम आराखडे तयार करण्यात आले आहेत.
सदर आराखड्यानुसार सन 2025 पासून सीबीएसई अभ्यासक्रमाचे शैक्षणिक धोरण शिक्षण विभाग कडून कार्यान्वित होत आहे. विद्यार्थी हित लक्षात घेऊन हे शालेय धोरण ठरविण्यात आले आहे.
राज्य अभ्यासक्रम आराखडा मसुद्यास मंजुरी देण्यापूर्वी तत्कालीन मंत्री, शालेय शिक्षण विभागाने विविध शिक्षक संघटनेच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली होती. तज्ञ समितीच्या मदतीने पायाभूत स्तरासाठी बालवाटिका, (एक-दोन-तीन) इयत्ता पहिली व दुसरी अभ्यासक्रम निर्मिती करण्यात आली. त्यानुसार अंतिम आराखड्यास राज्यस्तरीय सुकाणू समितीची मान्यता मिळाली आहे.
नवीन पाठ्यक्रमानुसार बालभारतीमार्फत इयत्ता पहिलीचे पाठ्यपुस्तक निर्मितीचे कामकाज सुरू आहे.इयत्ता पहिली ते दहावी साठी अभ्यासक्रम निर्मिती एस सी ई आर टी अंतर्गत करण्यात येत आहे.
टप्प्याटप्प्यानुसार अंमलबजावणी..
2025 मध्ये इयत्ता पहिली
2026 मध्ये दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावी
2027 मध्ये पाचवी ,सातवी, नववी, अकरावी
2028 मध्ये आठवी, दहावी, बारावी अशी इयत्तानिहाय व वर्षनिहाय अंमलबजावणी होणार आहे.
सीबीएसई अभ्यासक्रमामध्ये खालील गोष्टीवर भर देण्यात आला आहे..
1. संकल्पनेवर भर:
पाठांतरापेक्षा संकल्पनांच्या समजुतीवर अधिक लक्ष दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळू शकेल.
2. सतत आणि सर्वसमावेशक मूल्यमापन:
विद्यार्थ्यांच्या सततच्या प्रगतीवर लक्ष ठेवले जाते. केवळ अंतिम परीक्षा वर भर न देता प्रकल्प, उपक्रम आणि मूल्यांकन तंत्राचा समावेश करण्यात आला आहे.
3. राज्य, देश व जगातील ज्ञानावर भर :
स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त सीबीएससी अभ्यासक्रम जेएई, एनईईटी, यूपीएससी सारख्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
4. सॉक्स स्किल्स आणि समुपदेशनावर भर:
यामध्ये सॉफ्ट स्कील आणि समुपदेशनावर भर देऊन विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांना संवाद कौशल्य, नेतृत्व गुण, सृजनशीलता आणि ताणतणाव व्यवस्थापन याविषयी माहिती दिली जाणार आहे.
सीबीएसई धोरण महाराष्ट्रात लागू झाल्याने विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळणार आहे तसेच त्यांची गुणवत्ता सुधारून उज्वल भविष्याकडे त्यांची वाटचाल अपेक्षित आहे.
श्री महेशकुमार शिंदे
चीफ ब्युरो
महा शिक्षण न्यूज






