सनराइज् महाविद्यालय, श्रीगोंदा इयत्ता बारावीचा निकाल शंभर टक्के
सनराईज, श्रीगोंदा बारावीचा १०० टक्के निकाल
महा शिक्षण टाइम्स
श्रीगोंदा येथील सनराईज सायन्स,आर्टस, कॉमर्स महाविद्यालयाचा बारावीचा तीनही विभागांचा निकाल १०० टक्के लागला आहे, अशी माहिती प्राचार्या राजेश्री शिंदे यांनी दिली .
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळ पुणे, यांनी शैक्षणिक वर्ष 2024 – 25 निकाल जाहीर केला असून पुणे विभाग मधील सनराईज महाविद्यालय श्रीगोंदे (कनिष्ठ महाविद्यालय) श्रीगोंदे येथील सिद्धांत संदीप खाडे याने ८३.६७टक्के गुण मिळवून सायन्स विभागात प्रथम, स्वरा सुदाम पवार हिने ७०.५० टक्क्यांसह कॉमर्स विभागात प्रथम, सुहानी राजेंद्र दरेकर ही ८१ टक्के गुण मिळवून आटर्स विभागात प्रथम आली आहे. संस्थेचे अध्यक्ष सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहटादेवी सेवा प्रतिष्ठानने ‘केजी टू पीजी’ शिक्षणाची व्यवस्था तालुक्यातील वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांंना अल्प शैक्षणिक शुल्क मध्ये शैक्षणिक सुविधा श्रीगोंदा शहरात उपलब्ध केली आहे. त्याच बरोबर माहिती तंत्रज्ञान व कॉम्प्युटर सायन्स हे विषय चालू शैक्षणिक वर्षापासुन इयत्ता 11 वि प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. तसेच विद्यालयात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. याचा फायदा विद्यार्थ्यांना होतो.
यंदा बऱ्याच महाविद्यालयांचे बारावीचे निकाल कमी लागलेले आहेत. असे असतानाही सनराईज महाविद्यालयाने तीनही विभागांचा शंभर टक्के निकाल लावून शैक्षणिक क्षेत्रात झेप घेतली आहे.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्याचे शिक्षक व पालकांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक करियरसाठी शुभेच्छा दिल्या.
error: Content is protected !!