वडाचा मळा (भानगाव ) शाळेस तीन लाख रुपयांचे पारितोषिक
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजनेमध्ये वडाचा मळा (भानगाव) शाळेस तीन लाख रुपये पारितोषिक
महा शिक्षण टाइम्स :
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजनेमधून श्रीगोंदा तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांना अनुक्रमे तीन लाख, दोन लाख व एक लाखाचे बक्षीस मिळाले. त्यामध्ये भानगाव येथील वडाचा मळा या जिल्हा परिषद शाळेस तीन लाख रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले. मुख्याध्यापक नितीन नलगे यांनी माजी आमदार बबनराव पाचपुते यांच्या हस्ते हे पारितोषिक पंचायत समिती श्रीगोंदा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत स्वीकारले.
वडाचा मळा (भानगाव) येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा श्रीगोंदा तालुक्यात स्वच्छ शाळा सुंदर शाळा म्हणून अव्वल क्रमांकाने आली असून या शाळेने तीन लाख रुपयाचे पारितोषिक पटकावले आहे. येथे नितीन दिगंबर नलगे व सरिता नितीन नलगे या शिक्षक दांपत्याने शाळेचा कायापालट केला असून विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता पूर्ण वाढ ही केल्याने ही शाळा आदर्श ठरली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना विद्यालयाचे मुख्याध्यापक नितीन नलगे यांनी सांगितले की, सदर शाळेमध्ये पायाभूत सुविधा, शासन निर्णय अंमलबजावणी ,विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्याबरोबरच अध्ययन-अध्यापन प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. तसेच पर्यावरण जाणीव ,सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता, आरोग्य ,राष्ट्रीय एकात्मतेची भावना, व्यावसायिक शिक्षणाची तोंड ओळख, अंगीभुत कला क्रीडा गुणांचा विकास, शासकीय योजनांचा लाभ व विविध घटकांचा समावेश या उद्दिष्टांवर शाळेने काम केले आहे. या सर्व बाबींमुळे या शाळेस तीन लाख रुपये चा निधी बक्षीस रूपाने मिळाले आहे असे प्रतिपादन नितीन नलगे व सरिता नलगे यांनी केले.
पंचायत समिती श्रीगोंदा येथे झालेल्या समारंभात माजी आमदार बबनराव पाचपुते यांच्या हस्ते मुख्याध्यापक नितीन नलगे व सरिता नलगे यांना हे पारितोषिक वितरित करण्यात यावेळी गटविकास अधिकारी राणी फराटे गटशिक्षणाधिकारी सत्यजित मच्छिंद्र,भाजप नेते बाळासाहेब महाडिक शिक्षण विस्तार अधिकारी सिताराम भुजबळ, निळकंठ बोराडे,केंद्रप्रमुख कडूस, अलका वाजे, शिक्षक नेते आबासाहेब जगताप राजकुमार इतापे नितीन विरकर इत्यादी उपस्थित होते.
श्रीगोंदा तालुक्यात या शाळेला प्रथम क्रमांकाचे तीन लाख रुपयांचे पारितोषिक मिळाल्याबद्दल सरपंच जयश्री अशोक नवले, उपसरपंच मोहन कुदांडे ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक भापकर, तसेच पालक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.
error: Content is protected !!