कोळगाव येथे आजपासून केपीएल चा थरार
एकूण आठ संघांचा सहभाग तर हजारोंची बक्षीस आहे
महा शिक्षण टाइम्स :
कोळगाव येथे कोळगाव प्रीमियर लीग अर्थात के पी एल चा थरार सात एप्रिल ते दहा एप्रिल 2025 दरम्यान रंगणार आहे. या भव्य डे नाईट कॉस्को बॉल क्रिकेट स्पर्धाचे आयोजन कोळगाव ग्रामस्थांच्या वतीने श्री कोळाईदेवी विद्यालय क्रीडांगण येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये एकूण आठ संघ एकमेकांना भिडणार असून हजारोंची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
कोळगाव प्रीमियर लीग 2025 च्या डे नाईट क्रिकेट स्पर्धेत प्रथम पारितोषिक 15555 /- हेमंत नलगे मित्र मंडळ, द्वितीय पारितोषिक 11111/- योगेश (बाळू) लगड, 7777/-अक्षय नानासाहेब लगड, 5555/-चंद्रकांत काटे तर शिस्तबद्ध संघासाठी 2100 रुपयांचे पारितोषिक विश्वास थोरात यांच्याकडून ठेवण्यात आले आहेत.
याशिवाय टी-शर्ट सौजन्य डॉ. प्रवीण कुमार वाळके, युट्युब सौजन्य अभिजीत अंकुश जगताप, ट्रॉफी सौजन्य प्राध्यापक संजय लाकूडझोडे, अंपायंस कॉमेंट्री निलेश मुंडफण, बॉल सौजन्य रोहन लगड व अक्षय पवार, मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी सौजन्य माऊली अशोक बांदल, मॅन ऑफ द सिरीज दोन हजार रुपये आबासाहेब शेलार, बेस्ट बॅट्समन व बॉलर संदीप कुरूमकर आणि पाणी सौजन्य नंदकुमार लगड यांच्या वतीने करण्यात आले आहे.
कोळगाव येथील श्री कोळाईदेवी विद्यालय क्रीडांगणावर आज पासून डे नाईट कॉस्कोबॉल क्रिकेट स्पर्धेचा प्रेक्षकांना आनंद लुटण्यास मिळणार आहे.






