spot_img
spot_img
spot_img

NMMS व सारथी परीक्षेत श्री कोळाईदेवी विद्यालयाचे घवघवीत यश

एन.एम.एम.एस व सारथी परीक्षेत कोळाईदेवी विद्यालयाचे यश

महा शिक्षण टाइम्स :
 राष्ट्रीय आर्थिक दुर्बल शिष्यवृत्ती परीक्षा व सारथी परीक्षेमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या श्री कोळाईदेवी विद्यालयने उत्तम यश संपादन केले आहे. एन. एम.एम.एस व सारथी या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. एन एन एम एम एस या परीक्षेसाठी इयत्ता आठवीचे 70 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 37 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एक विद्यार्थी एन.एम.एम.एस शिष्यवृत्तीधारक तर सारथी शिष्यवृत्तीत 26 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
लगड प्रणव दौलत हा विद्यार्थी एन.एम.एम. एस शिष्यवृत्तीधारक झाला असून या विद्यार्थ्याला प्रतिवर्षी 12000 रू प्रमाणे इयत्ता नववी ते बारावी या चार वर्षांमध्ये 48000रु. शिष्यवृत्ती मिळणार आहे .सारथी शिष्यवृत्तीत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी प्रत्येकी 9600रु. याप्रमाणे इयत्ता नववी ते बारावी या चार वर्षांमध्ये 38400रू मिळणार आहे .
सारथी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी_
झेंडे साई सचिन,लगड साईराज ईश्वर,नलगे वैष्णवी व्यंकटेश, दळवी वैष्णवी नंदकुमार, बारवकर संग्राम संदीप,नलगे संस्कार रघुनाथ,नलगे तनुष्का सतिष, गाडेकर मानवी शरद,लगड हर्षवर्धन श्रीकांत,भापकर सार्थक सुनिल, लगड सार्थक अंकुश, पानसरे श्रावणी महेश,लगड सार्थक नंदू , सपाटे सायली युवराज, लगड सायली संजय, साळुंके आदेश संतोष,लगड भाग्यश्री संजय, आढाव भूमी मच्छिंद्र, तोंडे दिव्या नानासाहेब, झेंडे अक्षदा दीपक,
लाटे ज्ञानेश्वर संजय , मोहारे कृष्णा शरद, सपाटे कृष्णा बाळासाहेब , नलगे ईश्वरी नितीन, भापकर आयुष पांडुरंग, साके चिरायू संतोष
वरील सर्व शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना विभागप्रमुख रोहिणी बोऱ्हाडे व शुभांगी भोईटे, विषय शिक्षक कल्पना शेळके, सोनाली कळसकर ,वैशाली गाडेकर,अजय शिवरात्री व कल्याणी भंडारी यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक शहाजी हिरडे, डी, टी,गायकवाड, संजय ठोकळ यासह सर्व शिक्षक व विद्यार्थी तसेच स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, शाळा व्यवस्थापन व विकास समिती अध्यक्ष व सदस्य ,माता  पालक व शिक्षक पालक संघ, ग्रामपंचायत कोळगाव व सोसायटी पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!