कोळगाव मध्ये नागरिकांसाठी मोफत पाणपोई…
ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या उपक्रमाचे तिसरे वर्ष :
महा शिक्षण टाइम्स :
कोळगाव येथे मागील वर्षाप्रमाणेच ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने नागरिकांसाठी मोफत पाणपोई चा उपक्रम सरपंच पुरुषोत्तम लगड, माजी सरपंच हेमंत नलगे,मार्केट कमिटी संचालक नितीन डुबल, माजी उपसरपंच मधुकर लगड संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय जाधव , पदाधिकारी, सदस्य यांच्या हस्ते सुरू करण्यात आला.
कोळगाव मधील एसटी स्टँड परिसर व त्यापुढील चौकामध्ये जेष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने नागरिक, विद्यार्थी व प्रवासी यांना मोफत पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यासाठी मोफत पाणपोईचा उपक्रम सलग तिसऱ्या वर्षी ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने सुरू करण्यात आला. दरवर्षी सलग दोन महिने हा उपक्रम चालू असतो.
मार्च महिन्याच्या अखेरीस उन्हाळ्याच्या तीव्र झळा जाणवू लागल्याने नागरिकांच्या घशाला कोरड पडू लागली. उष्णतेमुळे पिण्यासाठी पाण्याची आवश्यकता निर्माण होऊ लागली. दरवर्षीप्रमाणे ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने
उन्हाळ्यामध्ये नागरिकांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी मोफत पाणपोई सुरू करण्यात आली.
यावेळी सरपंच पुरुषोत्तम लगड, माजी सरपंच हेमंत नलगे,मार्केट कमिटीचे संचालक नितीन डूबल, माजी उपसरपंच मधुकर लगड, धोंडीबा लगड, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय जाधव, बाळकृष्ण गायकवाड, प्रकाश शिंदे,विनायक जगताप,डॉक्टर बोरुडे,दादासाहेब घोंडगे, कैलास जगताप, भैरू भापकर, संभाजी लगड, दादासाहेब शिरसाठ,शिवसेना शहर प्रमुख प्रवीण खेतमाळीस, ग्रामपंचायत सदस्य चिमणराव बाराहाते, विलास शितोळे ,महेंद्र रणसिंग, विजय नलगे, अनिल धस, सतीश लगड, संजय नलगे ,संदीप दिवेकर, अमोल भापकर, प्रतीक लगड, संजय मेहत्रे, दत्तात्रय कर्डिले, विठ्ठल मोरे ,गणेश मोरे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.






