कोळगाव येथील तिवाटणे बंधूंचे कापड व्यवसायात पदार्पण…
महा शिक्षण टाइम्स :कोळगाव येथील यशस्वी व्यावसायिक तिवाटणे परिवार यांनी नुकतेच श्री कालिका स्टोअरचे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अभिजीत व अनिकेत तिवाटणे यांनी आई-वडिलांच्या शुभ हस्ते उद्घाटन करून कापड व्यवसायात पदार्पण केले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना
श्री कालिका या कापड दुकानाचे चालक श्री अभिजीत तिवाटणे व अनिकेत तिवाटणे यांनी सांगितले की, तिवाटणे कुटुंबामध्ये पन्नास वर्षांपूर्वी आजोबा कै. आबासाहेब तिवाटणे यांनी श्री कालिका हे किराणा दुकान सुरू केले. कोळगाव सारख्या ग्रामीण भागात जिद्द, चिकाटी ,कष्ट या जोरावर त्यांनी किराणा दुकानाचा व्यवसाय भरभराटीस आणला . या व्यवसायातून तिवाटणे परिवाराचे सर्वत्र नाव झाले. कै. आबासाहेब तिवाटणे यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे दोनही मुले सुनील व राजेंद्र यांनी आपले लक्ष किराणा व्यवसायावर केंद्रित केले. आणि वडिलांचा वारसा सक्षमपणे पुढे चालू ठेवला.
गावातील किराणा दुकान सुनील तिवाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असून कोळगाव फाट्यावर किराणा दुकानाची दुसरी शाखा राजेंद्र तिवाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. राजेंद्र तिवटणे यांचा मुलगा आशिष तिवाटणे यांनी वेगवेगळ्या एजन्सी चालवून श्रीगोंदा तालुक्यात मालाचा पुरवठा करीत आहेत. आपल्याच वडिलांचा आदर्श घेऊन सुनील व राजेंद्र यांच्या मुलांनीही नवनवीन व्यवसाय सुरू केले. यामध्ये सुनील यांची दोन्ही मुले अभिजीत व अनिकेत तिवाटणे यांनी किराणा दुकान व्यवस्थितरित्या सांभाळले.
अभिजीत व अनिकेत तिवाटणे या दोन्ही बंधूंनी श्री कालिका कापड दालनाची मुहूर्तमेढ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कोळगाव मध्ये रोवली. या कापड दुकानाच्या माध्यमातून साडी, शूटिंग, शर्टिंग, होजीअरी अशा भव्य दालनाचे कापड दुकान रविवार दिनांक 30 मार्च 2025 रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपल्या आई-वडिलांच्या हस्ते उद्घाटन करून सुरू होत आहे. या व्यवसायातून ग्राहकांना उत्कृष्ट सेवा आणि योग्य दर देऊन तिवाटणे परिवाराच्या वतीने ग्राहकांशी असलेला ऋणानुबंध पुढच्या पिढीकडे असाच चालू ठेवण्यात अभिजीत व अनिकेत तिवाटणे यांनी निर्धार केला आहे.
या उद्घाटन प्रसंगी कोळगाव येथील तिवाटणे परिवारातील सर्व सदस्य सर्व आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आजी-माजी सोसायटी चेअरमन ,व्हाईस चेअरमन, सर्व संचालक मंडळ, आजी-माजी सैनिक संघटना, पंचक्रोशीतील ग्रामस्थ व मित्रपरिवार हे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.






