कोळगाव , पुढारी वृत्तसेवा: कर्मवीर विद्याप्रबोधिनी, रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या मार्फत इयत्ता सातवी मध्ये प्रविष्ठ असलेल्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात रयत प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला.विद्यालयातील सोहम संदीप लगड व उत्कर्षा बिभीषण परकाळे हे दोन विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले. यावेळी यशस्वी विद्यार्थी, पालक व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.शहाजी हिरडे यांच्या हस्ते करण्यात आला.
पालक मनोगता मध्ये बिभीषण परकाळे व संदीप लगड यांनी विद्यार्थ्यांसाठी विद्यालय घेत असलेल्या परिश्रमाचे कौतुक केले. तसेच विद्यालयाने उत्तरोत्तर असेच यश संपादन करावे अशी इच्छा व्यक्त केली. श्रीगोंदा तालुक्यातील चार विद्यार्थी रयत प्रज्ञाशोध परीक्षेत पात्र झाले आहे व त्यामध्ये कोळाईदेवी विद्यालयाचे दोन विद्यार्थी आहे ही अतिशय अभिमानाची बाब आहे. असे विद्यार्थ्यांचे कौतुक करताना मुख्याध्यापक शहाजी हिरडे यांनी गौरवोद्गार काढले .विभाग प्रमुख वैशाली गाडेकर यांचे सुबद्ध नियोजन, जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकांचा सराव व अतिरिक्त मार्गदर्शन यामुळे विद्यालयास हे यश प्राप्त झाले .त्याचबरोबर विषय शिक्षक उषा गायकवाड, श्याम खेतमाळस, रोहिणी बो-हाडे मंजुश्री धिवर ,संगीता बर्वे व अजय शिवरात्री यांचेही अनमोल मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली पाटकुलकर यांनी केले






