कोळगाव, पुढारी वृत्तसेवा: कोळगाव येथील श्री कोळाईदेवी विद्यालयातील उपशिक्षक माऊली गलांडे यांना मराठी भाषा गौरव दिनानिमित्त रविवार दिनांक 23 मार्च रोजी टाकळीभान येथे आयोजित राज्यस्तरीय तिसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध भाषातज्ज्ञ व समीक्षक प्राध्यापक डॉक्टर केशवराव देशमुख, साहित्य संमेलनाच्या उद्घाटक ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या मानसकन्या सुप्रसिद्ध कवयित्री रेखाताई भाडारे, मराठी अभ्यास मंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अध्यक्ष डॉक्टर संदीप सांगळे, जल अभ्यास भिला पाटील,प्रमुख पाहुणे आमदार हेमंत ओगले, डॉ. वंदना मुरकुटे मा.सभापती श्रीरामपूर, ज्ञानज्योती चे अध्यक्ष अर्जून राऊत सर आणि उपाध्यक्ष संदीप पटारे सर या मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय उत्कृष्ट मराठी अध्यापन सेवा कार्य गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील श्री कोळाईदेवी विद्यालयात माऊली गलांडे उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे. विविध उपक्रमात सहभाग व उत्साही क्रीडाशिक्षक अशी त्यांची ओळख आहे.
सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक शहाजी हिरडे,प्रभारी पर्यवेक्षक संजय ठोकळ, ज्येष्ठ शिक्षिका सुवर्णा देशमुख यांच्यासह सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत माऊली गलांडे यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. माऊली गलांडे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल स्थानिक स्कूल कमिटी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष तसेच सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन व विकास समिती अध्यक्ष व सदस्य, पालक तसेच सर्व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.






